विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:22 PM2018-12-26T17:22:31+5:302018-12-26T17:22:36+5:30

नाशिक : माहेरून पाच लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासरकडील मंडळींकडून गत सहा वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक त्रासामुळेच मुलगी माधुरी सागर पानगव्हाणे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमनाथ पगार यांनी पोलिसात दिली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरोधात आत्महत्सेय प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे़

Offense against husband-father-in-law for suicidal behavior | विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देभद्रकाली पोलिस ; पतीसह सासरच्यांना अटक

नाशिक : माहेरून पाच लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासरकडील मंडळींकडून गत सहा वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक त्रासामुळेच मुलगी माधुरी सागर पानगव्हाणे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमनाथ पगार यांनी पोलिसात दिली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरोधात आत्महत्सेय प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे़

सोमनाथ पगार (रा़ खडकजांब, ता़ चांदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी माधुरी हिचा विवाह सागर रमेश पानगव्हाणे (रा़ छपरा निवास, जिल्हा परिषदेसमोर, नाशिक) सोबत झालेला होता़ पती सागर पानगव्हाणे, जेठ प्रविण पानगव्हाणे, सासरे रमेश पागनव्हाणे व सासू अलका पानगव्हाणे हे रिकामे झालेल्या गाळ्यांची दुरुस्तीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची २०१२ पासून सतत मागणी करीत होते़ मात्र पैसे न दिल्याने किरकोळ कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शारीरिक, मानसिक छळ करीत होते़ या त्रासामुळे कंटाळलेल्या माधुरीने २० डिसेंबर रोजी राहत्या घरासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली़

मुलीला आत्महत्येस करण्यासाठी पती व सासकडील मंडलींनीच प्रवृत्त केल्याचे पगार यांनी फिर्यादीत म्हटले आहे़

सराफ बाजारातून दागिण्यांची चोरी
नाशिक : महिलेची पर्स कापून त्यातील ६० हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे वळे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सराफ बाजारात घडली आहे़ डिसोझा कॉलनीतील सुनील प्रधान या १४ डिसेंबर रोजी दुपारी सराफ बाजार येथे गेल्या होत्या़ या ठिकाणी चोरट्यांनी त्यांची पसृ काढून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वडाळारोड परिसरातील मुलीचे अपहरण
नाशिक : वडाळा रोडवरील जेएमसीटी महाविद्यालयाजवळील दीपालीनगरमधील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि़२५) घडली़ या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़

महागड्या सायकलची चोरी
नाशिक : देवळाली कॅम्पमधील रेजिमेंट लाईनमधील रहिवासी राहुल दुबे यांची १६ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची फायर फॉक्स कंपनीची रेजंर गियर सायकल चोरट्यांनी सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

घरफोडीत सोन्याच्या दागिण्यांची चोरी
नाशिक : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५९ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १६ व १७ डिसेंबर या कालावधीत जेलरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी प्रेमकुमार बावा (२९, समर्पण बंगला, अयोध्यानगर, सायट्रीक) यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़

किरकोळ कारणावरून विवाहितेचा छळ
नाशिक : घरातील कामावरून कुरापत काढून गत चार वर्षांपासून पतीसह सासरकडील मंडळी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून शारीरीक व मानसिक छळ केला असून विवाहातील दागिण्यांचा अपहार केल्याची फिर्याद विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पती प्रविण चव्हाण, त्र्यंबक चव्हाण (सासरे), शांती चव्हाण (सासू), नणंद - मानसी गडकर, सपना जाधव (रा़ वडाळीभोई, ता़चांदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Offense against husband-father-in-law for suicidal behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.