‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

By Admin | Published: October 9, 2016 01:50 AM2016-10-09T01:50:12+5:302016-10-09T01:50:46+5:30

‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

Offense of 'HBN' operators | ‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

‘एचबीएन’ संचालकांवर गुन्हा

googlenewsNext

नाशिक : देशभर व्याप्ती असलेल्या हायटेक बिझनेस नेटवर्क अर्थात एचबीएनच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे़ या कंपनीच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली़ दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहाजवळील कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे, दोन संगणक व हार्डडिस्क पोलिसांनी जप्त केल्या आहेत़
अल्पबचतीच्या विविध योजना तसेच सहा वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून एचबीएन कंपनीने शहरासह जिल्हाभरातून सुमारे ३ ते ५ हजार गुतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घेतली़ मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकारणे सुरूच ठेवले़ उपनगर पोलिसांनी एचबीएन डेअरी अँण्ड इलाइड लिमिटेडचे संचालक हरमंदर सिंग बलदेवसिंग श्राण, मनजित कौर, तारासिंग श्राण, अमरदीपसिंग हरमंदरसिंग श्राण (सर्व रा. पंजाबी बाग, नवी दिल्ली), जसबीर कौर, गुरुचरणसिंग (रा. सुभाषनगर) आणि कल्पना दिघे (रा. शिवाजीनगर, आडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Offense of 'HBN' operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.