आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:01 AM2019-07-16T01:01:21+5:302019-07-16T01:02:09+5:30
दीड वर्षापूर्वी मुलीचा प्रेमविवाह झाला, मात्र सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू देत नव्हते. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे अखेर तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने पंचवटी पोलिसांकडे केली आहे.
नाशिक : दीड वर्षापूर्वी मुलीचा प्रेमविवाह झाला, मात्र सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू देत नव्हते. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे अखेर तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने पंचवटी पोलिसांकडे केली आहे. यानुसार सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहितेला सासू, सासरे, पती अनिल पंडित, दीर सुनील पंडित, नणंद, मामा हे सर्व सासरचे लोक माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलू व भेटू देत नव्हते. घरातील कामावरून सर्वजण तिला शिवीगाळ करायचे. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती आठ महिन्यांची गरोदर असताना सासरच्या लोकांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने शुक्र वारी (दि.१२) सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यू. आर. गवळी करीत आहेत.