संपकरी कामगारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:46 PM2018-11-13T17:46:12+5:302018-11-13T17:46:26+5:30
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्यातील कामगारांची कामावर जाण्यास अडवणूक केल्या प्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्यातील कामगारांची कामावर जाण्यास अडवणूक केल्या प्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केटाफार्मा कारखान्याच्या मटेरीअल गेटसमोर रविवारी सकाळी ९ वाजता सदरचा प्रकार घडला. याबाबत कारखान्याचे संचालक श्रीकांत लक्ष्मीनारायण करवा (५९) यांनी पोलीस ठाण्यात संपकरी कर्मचाºयांविरोधात फिर्याद नोंदविली आहे. कामगारांना कारखान्यात घेवून जाणारी बस (क्र. एम एच १५ इ. एफ. ३३१) अनाधिकृतपणे अडवून बसमधील कर्मचाºयांना आतमध्ये जाऊ देणार नाही. तसेच नवीन कर्मचाºयांना कामावर घ्यायचे नाही अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. करवा यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब ताकाटे, माधव उगले, अंबादास उगले, अविनाश उपासने, रवींद्र पगार, ज्ञानेश्वर पाटील, शरद गुरूळे या संशयितांसह संपातील कर्मचारी यांच्यावर बसमधील कर्मचाºयांना दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल वसावे करीत आहे.