सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:09 PM2018-10-24T19:09:28+5:302018-10-24T19:09:49+5:30

जायखेडा : येथील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कन्या यशोदाआक्का महाजन यांच्याविषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी वायगांव येथील तरुणाविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

Offensive text on social media | सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर

सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर

Next
ठळक मुद्देवायगांव येथील तरु णाविरोधात पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल

जायखेडा : येथील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कन्या यशोदाआक्का महाजन यांच्याविषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी वायगांव येथील तरुणाविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.
वायगांव (ता. बागलाण) येथील तरु ण रविंद्र अहिरे याने व्हॉट्सअ‍ॅप सोशल मिडियावर ग्रामपंचयात वायगांव हा ग्रुप बनविला असून त्यात १०५ सदस्य आहे. वायगांव येथे हनुमान मंदिराच्या भूमिपूजन जायखेडा येथील वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या वारसदार यशोदाआक्का महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु महिलेच्या हस्ते हनुमान मंदिराचे भूमिपूजन करता येते का, अशा आशयाचा मजकूर सोशल मिडियात पसरविल्याची तक्र ार करण्यात आली आहे. याप्रकरणी वायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक अहिरे यांनी जायखेडा पोलीसात फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Offensive text on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.