पुरातत्व खात्याचे कार्यालयच बेकायदेशीर जागेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:06+5:302021-02-12T04:15:06+5:30

पुरातत्व विभागाने केलेल्या खुलाशात सदर कार्यालय पाथर्डी येथील सर्व्हे क्रमांक २८५/३/ई/२ या जागेत असल्याचे नमूद केले आहे; परंतु कार्यालयाचे ...

The office of the Archaeological Department is on an illegal site | पुरातत्व खात्याचे कार्यालयच बेकायदेशीर जागेवर

पुरातत्व खात्याचे कार्यालयच बेकायदेशीर जागेवर

Next

पुरातत्व विभागाने केलेल्या खुलाशात सदर कार्यालय पाथर्डी येथील सर्व्हे क्रमांक २८५/३/ई/२ या जागेत असल्याचे नमूद केले आहे; परंतु कार्यालयाचे प्रत्यक्ष ठिकाण आणि खुलाशात दर्शविण्यात आलेला सर्व्हे क्रमांक हा भिन्न असल्याचे मोजणी नकाशावरून आढळून आला आहे. फाळके स्मारकाच्या जवळ पांडव लेण्याच्या पायथ्याशी भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचे नाशिक उपमंडळ कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सदर जागा ही आपल्या मालकीची असल्याचे सांगत पुरातत्व विभागाचे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार जागेचे मालक आनंद शिरसाठ यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे महापालिकेकडे केली होती. ही तक्रार नगररचना विभागाकडे वर्ग झाल्यानंतर नगररचना विभागाने चौकशी करून पुरातत्व विभागाच्या कार्यालयास १८ डिसेंबर २०१७ रोजी नोटीस बजावली होती. सदर जागेच्या मालकीसंदर्भात तसेच कार्यालयाच्या अधिकृततेबाबत खुलासा करण्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले होते. यावर पुरातत्व विभागाच्या नाशिक उप-मंडळ कार्यालयाने महापालिकेला खुलासा सादर केला. त्यात सदर मिळकत पाथर्डी शिवारातील सर्व्हे क्रमांक २८५/३/ई/२ या हिश्श्यात धर्मराज विकास मंडळ द्वारा चावडी मालकीच्या जागेत असल्याचे नमूद केले होते; मात्र जागा मालकाने सादर केलेल्या मोजणी नकाशात सदर कार्यालय आणि पाथर्डी सर्व्हे क्रमांक २८५/३/ई/२ ही मिळकत भिन्न ठिकाणी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महापालिकेने गेल्या महिन्यात पुन्हा एकदा पुरातत्व खात्याच्या कार्यालयाला नोटीस बजावत खुलासा करण्याची सूचना केली होती. नगररचना विभागाने पुरातत्व खात्याच्या नाशिक उपमंडळ कार्यालयाला बजावलेल्या नोटीसीत सातबारा उताऱ्यानुसार जागेचा सीमांकन नकाशा, सातबारा उताऱ्यावरील भोगवटदार यांच्याशी झालेल्या करारनाम्याची प्रत, कार्यालयाच्या बांधकामासाठी घेतलेली नगररचना विभागाकडील परवानगी, संबंधित नकाशा आदी कागदपत्रे सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: The office of the Archaeological Department is on an illegal site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.