पदाधिकारी लागले ‘कामाला’,

By admin | Published: October 18, 2014 12:21 AM2014-10-18T00:21:11+5:302014-10-18T00:23:10+5:30

सीईओंची घेतली भेट

The office bearers started 'Kamla', | पदाधिकारी लागले ‘कामाला’,

पदाधिकारी लागले ‘कामाला’,

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतालाच जिल्हा परिषद सेस निधी वाटपाचा वाद आल्याने पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच त्यांना या निधी वाटपाबाबतच्या नियोजन करण्याच्या कामाला लागावे लागल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.
दरम्यान, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र देऊन नियमानुसार मंजूर असलेल्या कामांच्याच निधीची मागणी करावी, या आशयाचे पत्र दिल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे समजते. याबाबत पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केल्याचे कळते.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळीच आचारसंहिता लागल्याने मागील सेस निधीचे वाटप व त्यानुसारचे निर्णय याबाबत विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय झालेले आहेत. सर्वच विभागांच्या निधी कपात व वाढ याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय झालेले आहेत. तरीही यातील सुमारे ८० लाखांचा निधी शिल्लक राहिलेला असताना त्याचे दोन सदस्यांनी परस्पर प्रत्येकी ४० लाखांचे वितरण केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. दरम्यानच्या काळात मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी जे सर्वसाधारण सभेत निर्णय झाले, ज्या विभागांना जितका निधी मंजूर आहे तितक्याच निधीची देयके वित्त विभागात सादर करावीत, त्यापेक्षा जास्त देयके असल्यास त्याची जबाबदारी लेखा विभागाची नाही, असे स्पष्ट कळविल्याने काही खातेप्रमुखांची अडचण झाली आहे.

Web Title: The office bearers started 'Kamla',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.