पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 05:00 PM2019-02-16T17:00:08+5:302019-02-16T17:00:30+5:30
येवला : येवला तालुका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. शेवाळे यांची नाशिक जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल येवला तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.
येवला : येवला तालुका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. शेवाळे यांची नाशिक जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल येवला तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.
कॉंग्रेस पक्ष म्हणजे लोकांची चळवळ आहे. कॉंग्रेस पक्षाचे स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघउणीत मोलाचे योगदान आहे. तसेच गांधी घराण्याचे देशासाठी या भुमीवर रक्त सांडले असून गांधी घराण्यातील सदस्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. तेव्हा पदाधिकाºयांनी मोठ्या जोमाने कॉंग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कामाला लागावे. तसेच राज्यात व देशात कॉंग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. शेवाळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.
तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख यांनी बैठकीचे प्रास्ताविकात तालुक्यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच बुथ कमिटी, शक्ती अॅप, जनसंपर्क अभियानाची माहिती दिली.
यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, गुणवंत होळकर, अरु ण आहेर, रश्मी पालवे, विकास चांदर, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, नंदकुमार शिंदे, उस्मान शेख, नानासाहेब शिंदे, आशा झाल्टे, शरद लोहकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस विलास नागरे यांनी तर आभार शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
बैठकीस जेष्ठ कॉंग्रेस नेते तात्यासाहेब लहरे, बळीराम शिंदे, जरार पिहलवान, मंगल परदेशी, विजय कदम, अनिल खैरे, रआबासाहेब शिंदे, संदीप मोरे, माधव सोळसे, ईकबाल पटेल, शिवाजी धनगे, सुकदेव मढवई, अमीत पटणी, अण्णासाहेब पवार, एकनाथ गायकवाड, राजेंद्र गणोरे, डॉ. निलम पटणी, दिलीप तक्ते, रावसाहेब लासुरे, धनंजय पैठणकर, अर्चना शिंदे, मनोहर गुंजाळ, शिवनाथ खोकले, दत्तु भोरकडे, गणेश ढिकले, जयप्रकाश वाघ, दयानंद बेंडके, मुसा शेख, मुकेश पाटोदकर, राहुल गोराडे, नवनाथ भोसले, राजेंद्र पैठणकर, दादाभाऊ मोरे, सविता गणोरे, अशोक नागपुरे, लांडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.