कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:40 PM2021-05-22T19:40:29+5:302021-05-23T00:18:59+5:30
चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.
चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.
राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे.
यामुळे खर्चाला मोठा आळा, तसेच मोजक्याच मंडळींच्या उपस्थित, कमी गर्दी असल्याने यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची गरज भासत नाही. विवाह समारंभ निश्चितच करून
दिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे.
त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विवाह समारंभाबाबत अनेकांच्या इच्छा अपेक्षा असतात. सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती तेवढे मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोंनी दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या. त्यासाठी वेगवेगळे मेनू तयार करायचे. परंतु आताच्या काळात हे सगळं स्वप्नवत झाले आहे.
अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्क
अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.
मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.
शेतातील आखाड्यावर स्वयंपाक
शेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपमोगतआहेत.
कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतात
चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालयाऐवजी शेतातच विवाह सोहळा उरकण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.
शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतातच छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे. अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.
शेतातील आखाड्यावर स्वयंपाक
शेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.