अधिकारी जुमानेना, महापौरांचे ऐकेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:58 AM2017-09-03T00:58:20+5:302017-09-03T00:58:36+5:30
महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या वारंवार बैठका घेऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याबद्दल महापौरांनी खंत व्यक्त करत थेट आयुक्तांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाशिक : महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या वारंवार बैठका घेऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याबद्दल महापौरांनी खंत व्यक्त करत थेट आयुक्तांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेत भाजपाला सत्ता काबीज करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापही भाजपाला सूर गवसलेला नाही. सहा महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे भाजपाची स्थिती दोलायमान झाल्याचेच दिसून आले आहे. प्रामुख्याने, सत्ताधारी पदाधिकाºयांमध्ये असलेला अंतर्गत विसंवाद हा पक्षाला वारंवार अडचणीत आणू पाहत आहे. दरम्यान, सहा महिन्यांच्या कालावधीत पदाधिकाºयांसह सत्ताधारी भाजपातील काही नगरसेवकांकडून अधिकाºयांना लक्ष्य केले जात असल्याने अधिकारीवर्गात प्रचंड नाराजीचा सूर आहे. अधिकारीवर्ग आपल्या कक्षात थांबण्याऐवजी महापौर, सभागृहनेता, गटनेता, स्थायी समिती सभापती यांच्या कक्षातच अधिक काळ दिसून येत असून, कामकाजात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला जात असल्याच्याही तक्रारी अधिकारीवर्ग खासगीत बोलून दाखवत आहेत. मागील आठवड्यात सभागृहनेत्याने सर्व खातेप्रमुखांना कामकाज कसे करावे, याबाबतची संहिताच पाठविल्याने अधिकारीवर्गात तो संतापाचा आणि मनोरंजनाचाही विषय बनला आहे. बैठका हायजॅक करण्याच्या प्रकारामुळेही अधिकारीवर्ग वैतागला आहे. मागील पंधरवड्यात आरोग्य समितीने बोलाविलेली बैठक महापौरांनी हायजॅक करत आरोग्य सभापतीलाच जाब विचारणे सुरू केले होते. पदाधिकाºयांमध्ये एकमेकांत पायपोस नसताना त्यात अधिकारीवर्ग भरडला जात असल्याची चर्चा आहे. अशा नाराजीच्या परिस्थितीत अधिकारीवर्ग सत्ताधारी पदाधिकाºयांना जुमेनासा झाला आहे. त्याचा फटका महापौरांनाही बसला आहे.