दातली बंधाऱ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:59 PM2019-11-12T15:59:27+5:302019-11-12T15:59:36+5:30
सिन्नर : तालुक्यातील दातली येथील धरणाच्या भरावाला भेगा पडलेल्या ठिकाणी दोन बाय तीन फुटाचे खड्डे खोदून त्यात होणा-या या बदलांची चाचणी घेण्यात येणार आहे.
सिन्नर : तालुक्यातील दातली येथील धरणाच्या भरावाला भेगा पडलेल्या ठिकाणी दोन बाय तीन फुटाचे खड्डे खोदून त्यात होणा-या या बदलांची चाचणी घेण्यात येणार आहे. धरणाच्या भरावाला भेगा गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आठवडाभरापूर्वी परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, दिवसागणकि ही भेग रूंदावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपसरपंच ज्ञानेश्वर नागरे, ग्रामपंचायत सदस्य धनराज कुटे, गणपत कुटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुखदेव आव्हाड, प्रा. हेमंत भाबड आदींनी पाटकºयांसह रविवारी (दि.१०) सायंकाळी या भागाची पाहणी केली. भरावाला जवळपास आठशे मीटर लांबीची व पाच ते सहा फूट खोल भेग दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला याबाबत कल्पना दिली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोरे, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अभियंता ए. डी. पाटील, शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, सी. आर. गाडे आदींनी भेगाळलेल्या भागाची पाहणी केली.ग्रामस्थांनी घाबरण्याचे काही एक कारण नसल्याचे मोरे यांनी सांगितले. तथापि, खबरदारी म्हणून भेगाळलेल्या भागात पाटबंधारे विभागाच्यवतीने एक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील उपाययोजनांबाबत कार्यवाही होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर नागरे, माजी सरपंच पंढरीनाथ आव्हाड, सोसायटीचे अध्यक्ष रामदास भाबड, तुकाराम शेळके, वाल्मिक शेळके, देवराम भाबड, सूर्यभान भाबड, कमलाकर शिंदे, दौलत चांदोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.चौकट-भरावाच्या पोटातील काळी माती भिजल्यानंतर ती फुगते. त्यामुळे मातीच्या धरणांना बºयाचदा अशी समस्या उद्भवत असते. मात्र फार काळजी करण्याचे कारण नाही. परिसरातील काटेरी बाभळी, झुडपे तोडून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.