अधिकारी-सेवकांनी मुख्यालयीच थांबावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 09:01 PM2020-05-14T21:01:31+5:302020-05-14T23:58:42+5:30
सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.

सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत
त्या बोलत होत्या. आपल्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ चा नवीन रुग्ण आढळू नाही यासाठी काय काळजी घ्यावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
बाहेरून येणाऱ्यांना घरातच क्वॉरण्टाइन करावे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत व कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येकाने आपल्या कार्यकक्षेतील ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मधुमेह असणारे ज्येष्ठ नागरिक, गरोदर
महिला यांच्यावर विशेष
लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.