पिंप्री येथील कोविड सेंटरला अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:54 PM2020-07-12T22:54:46+5:302020-07-13T00:16:40+5:30

ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाला थोपवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पिंप्री येथील एकलव्य आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख आदी उपस्थित होते.

Officers visit Kovid Center at Pimpri | पिंप्री येथील कोविड सेंटरला अधिकाऱ्यांची भेट

पिंप्री येथील कोविड केंद्राला उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट दिली. त्याप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, डॉ. देशमुख आदी.

Next

वैतरणानगर : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाला थोपवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पिंप्री येथील एकलव्य आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख आदी उपस्थित होते.
इगतपुरी तालुका आदिवासी दुर्गम भाग असून, येथील जनतेला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने निसर्गरम्य वातावरण असलेल्या पिंप्री परिसरात हे कोविड सेंटर स्थापन करण्यात आल्याने रुग्णांना बरे होण्यासाठी येथील वातावणाचीही मदत होत आहे. आतापर्यंत बहुतांशी बाधित बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Web Title: Officers visit Kovid Center at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.