कार्यालयांमध्ये दहशतवादविरोधात प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:44 AM2018-05-23T00:44:58+5:302018-05-23T00:44:58+5:30
महानगरपालिकेच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली.
नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातील स्व.राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुक्तांनी दहशतवाद विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, रमेश पवार, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ,रोहिदास बहिरम,रोहिदास दोरकुळकर, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, सहायक संचालक नगररचना आकाश बागुल, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, नगर सचिव गोरखनाथ आव्हाळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी कुलगुरु डॉ. म्हैसेकर, प्रति कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी पंडित गवळी यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस पाळण्यात येतो. प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रप्रेम जागृत ठेऊन कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ. संदीप गुंडरे, संजय नेरकर, संदीप कुलकर्णी, आर. बी. नाकवे, डॉ. आर. टी. अहेर, प्रकाश पाटील, अनंत सोनवणे, संजय मराठे, डॉ. स्वप्नील तोरणे, दीपक शेळके, संदीप राठोड, डॉ. प्रदीप आवळे, प्रशांत पवार, सचिन बोरसे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणच्या परिमंडल कार्यालयात सोमवारी दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांना दहशतवादविरोधी प्रतिज्ञा दिली. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. दहशतवाद व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याबरोबरच शांती, सामाजिक सलोखा तसेच सामंजस्य टिकवून ते वृद्धिंगत करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, प्रेरणा बनकर, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, व्यवस्थापक सुरेश रोकडे, मंगेश गाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर, व्यवस्थापक विशाल मरकड, माधुरी कुलकर्णी, सहायक विधि अधिकारी प्रशांत लहाने, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, सहायक अभियंता सतीश मेहेर, भूषण पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.