ओझर वायुसेना स्टेशनला राजभाषा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:39 AM2018-07-02T00:39:42+5:302018-07-02T00:40:21+5:30
नाशिक : ओझर येथील वायुसेनेच्या इलेव्हन बेस रिपिअर डेपोला राजभाषा हिंदीच्या प्रभावी कार्यान्वयासाठी २०१७-१८ साठी प्रथम क्रमांकाचा राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नाशिक : ओझर येथील वायुसेनेच्या इलेव्हन बेस रिपिअर डेपोला राजभाषा हिंदीच्या प्रभावी कार्यान्वयासाठी २०१७-१८ साठी प्रथम क्रमांकाचा राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नाशिक शहर राजभाषा कार्यान्वयीन समितीतर्फे हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी व प्रशिक्षणासाठी ओझर डेपोला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या नाशिक शहर राजभाषा कार्यान्वयीन समितीला प्रथम पुरस्काराने तसेच वायुसेनेची वार्षिक हिंदी गृहपत्रिका कायाकल्पसाठी तृतीय पुरस्काराने वायुसेना स्टेशनला सन्मानित करण्यात आले. नगर राजभाषा कार्यान्वयीन समितीच्या बैठकीत वायुसेना स्टेशन ओझरमार्फत स्क्वॉड्रन लीडर बी. एम. जोसेफ वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हिंदीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी ११ बेस रिपिअर डेपोला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.