अधिकारी दौर्यावर; विद्यापीठ वार्यावर
By admin | Published: August 4, 2015 12:10 AM2015-08-04T00:10:44+5:302015-08-04T00:11:04+5:30
शिष्टमंडळ परतले : स्वाभिमान संघटनेची निदर्शने
नाशिक : आठवड्याच्या पहिल्याचदिवशी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेकुलगुरू, कुलसचिव आणि प्र-कुलगुरूही दौऱ्यावर असल्याने आणिविद्यापीठात कुणीही जबाबदारअधिकारी नसल्याने अपीलकरण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानसंघटनेच्या शिष्टमंडळाला परतावे
लागले. यामुळे शिष्टमंडळानेघोषणाबाजी करीत कुलगुरूंचानिषेध नोंदविला.आरोग्य विज्ञान विद्यापीठातअनेकदा कुणीही जबाबदार अधिकारीउपस्थित राहत नसल्याने आणिएकाचवेळी सर्व अधिकारी पुणे, मुंबई वारी करीत असल्याने अनेकविद्यार्थ्यांची आणि पालकांचीगैरसोय होत असल्याची तक्रारस्वाभिमान संघटनेला प्राप्त झालीहोती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप कोतवाल यांच्यामार्गदर्शनाखाली कुलगुरूंनाभेटण्यासाठी गेलेल्याशिष्टमंडळालाही तोच अनुभव आला.विद्यापीठात कुलगुरू, कुलसचिवआणि प्र-कुलगुरूही उपस्थितनसल्याने अपील करणार कुणाकडे?असा प्रश्न निर्माण झाला. यावेळीउपस्थित एकाही अधिकाऱ्यानेआपणाला अपील स्वीकारण्याचाअधिकार नसल्याचे सांगितले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्याकार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेरघोषणाबाजी केली. विद्यापीठातकुणी अधिकारी नसेल तर थेटवैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेयांच्याकडे अपील करावे काय? असाप्रश्न कोतवाल यांनी उपस्थित केला.यावेळी येथील माहितीअधिकाऱ्याने प्रशासन अधिकाऱ्याकडेबोट दाखविले, तर प्रशासनअधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले मात्रअपील मात्र स्वीकारता येणारनसल्याचे सांगितले.विद्यापीठाचे अपिलीयअधिकारी स्वत: कुलसचिव असल्यानेतेच अपील स्वीकारू शकतात, असेसांगितले. यावेळी प्रशासन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतसंघटनेने येथील कारभारामुळे विद्यार्थीआणि पालकांची गैरसोय होतअसल्याचे आणि कामे होत नसल्यानेमनस्ताप होत असल्याची बाबनिदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)