गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:28 PM2020-10-04T23:28:04+5:302020-10-05T00:51:53+5:30
नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजगार हमी योजनेवरील अधिकाºयांना ‘अपडेट’ केले जाणार आहे.
नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजगार हमी योजनेवरील अधिकाºयांना ‘अपडेट’ केले जाणार आहे.
रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना समजणे अपेक्षित आहेच शिवाय आपल्या कार्यक्षेत्रात या योजनेतून गावे समृद्ध झाली असेल तर त्याचा शोध घेऊन अभ्यास करणे अपेक्षित आहे. संबंधित ठिकाणचे गाव समृद्ध झाले तर आपल्याही कार्यक्षेत्रात असे घडू शकते असा विचार करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी अधिकाºयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. अधिकाºयांकहून हतबलता निर्माण करणारे उत्तरे दिली जाणार नाहीत अशी अपेक्षा या प्रशिक्षणातून निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीर रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विशष्ेष तरतुदींचा लाभ कसा घ्यावा याविषयी व्हिडीओ आणि पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहेच शिवाय स्वता: पुढाकार घेण्याची अपेक्षा असणार आहे. कोणतीही योजना समजून घेऊन राबविल्याशिवाय त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही त्यासाठी स्वता:हून माणसे, गावे, तालुके, इत्यादिंचा शोध घेऊन त्यांच्याकहून शिकण्याच्या प्रयत्न करावा तसेच वरिष्ठांशी चर्चा, गरज पडल्यास शासनाकडे सूचना पाठविण्याची प्रक्रिया करण्यासाठी अधिकाºयांना तयार केले जाणार आहे.
प्रशिणाची आवश्यकता कुठे?
यशस्वी गावांच्या माहितीचा अभाव, नैसर्गिक संसाधन आणि व्यवस्थापाची कामे माथा ते पायथा घ्यावयाची असल्याच्या संकल्पनेची अस्पष्टता, शााळांच्या गुणवत्ता सुधाराची माहितीची गरज, आॅनलाईन प्रशिक्षणाचा वापर करणे आदि मुद्यांवर भर देण्यात आला आहे. मेट, ग्राम रोजगार सेवक, तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रम अधिखारी यांना प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. दर आठवड्याला एक व्हिडीओ, पीपीटी आणि त्यावर प्रश्न असे स्वरूप असणार आहे.