दुष्काळ पाहणी दौऱ्याकडे अधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:14 AM2019-05-07T06:14:07+5:302019-05-07T06:15:00+5:30

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्'ात दुष्काळ पाहणी दौ-याचे नियोजन केले.

 Officials of the Drought Report visited the tour, the spokesman expressed the lack of power | दुष्काळ पाहणी दौऱ्याकडे अधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता

दुष्काळ पाहणी दौऱ्याकडे अधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता

Next

- शैलेश कर्पे
नाशिक - राज्यातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्'ात दुष्काळ पाहणी दौºयाचे नियोजन केले. मात्र तलाठ्यांपासून प्रांताधिकाºयांसह अनेक शासकीय अधिकाºयांनी या दौºयाकडे अक्षरश: पाठ फिरवली. आचारसंहितचा बाऊ करून अधिकारी उपस्थित राहिल्याची हतबलता खुद्द पालकमंत्र्यांनी बोलून दाखविली. लोकप्रतिनिधींचा मात्र ‘सुकाळ’ होता.

महाजन यांनी नाशिक जिल्'ाच्या दुष्काळ पाहणी दौºयास सिन्नर तालुक्यातून प्रारंभ केला. तालुक्यातील भोकणी, पांगरी, वावी व पंचाळे या दुष्काळी गावांना भेटी दिल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. मात्र सोबत अधिकारी व कर्मचारी नसल्याने जनतेने मांडलेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्र्यांना दरवेळी मोबाइलवर अधिकाºयांशी बोलण्याची वेळ आली. दोन दिवसांत चारा व पाणी पुरविण्यासाठी जिल्हाधिकाºयांसोबत फोनवर चर्चा झाल्याचे महाजन यांनी सांगितले.

अधिकारी दौºयात नव्हते. मात्र आ. राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, नगराध्यक्ष किरण डगळे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पहिल्यांदाच पालकमंत्र्यांच्या दौºयात शिवसेनेचे पदाधिकारी दिसले, मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांची अनुपस्थित प्रकर्षाने जाणवली.

Web Title:  Officials of the Drought Report visited the tour, the spokesman expressed the lack of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.