महावितरणच्या अधिकाºयांना डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:33 AM2017-10-06T00:33:26+5:302017-10-06T00:33:48+5:30
आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले.
पंचवटी : आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून सकाळ, सायंकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रभागाच्या महिला लोकप्रतिनिधीला घेराव घातला होता तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाºयांना गावबंदीचा इशाराही दिला होता. तरीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. गुरुवारी सकाळीच महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व त्यानंतर ग्रामस्थ आंदोलनात उतरले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, शेतीची कामे खोळंबली जात आहे. वारंवार तक्र ारी करूनही वीज वितरण कंपनी दखल घेत नाही शिवाय आडगाव सोडून अन्य भागांत वीजपुरवठा सुरळीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले, तर काहींनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसले. यावेळी तेथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारंबे व सहायक अभियंता मनीष पगार आदी दोघे उपस्थित होेते. त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांना तेथेच डांबले. घटनेचे वृत्त कळताच महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घातला व वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो याची विचारणा करून महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात नगरसेवक, शेकडो ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदरचा प्रकार महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयास कळाल्यांनतर तेथे अन्य अधिकारी तोडगा काढण्यासाठी पाठविण्यात आले.