अधिकाºयांची ‘झाडाझडती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:15 AM2017-10-06T00:15:54+5:302017-10-06T00:16:42+5:30
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेबाबत केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मुख्यालय इमारतीतील काही विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांची ‘झाडाझडती’ घेतली. तसेच दिवाळीपूर्वीच सर्व विभागांची स्वच्छता झाली पाहिजे, असे आदेश दिले.
नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेबाबत केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मुख्यालय इमारतीतील काही विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांची ‘झाडाझडती’ घेतली. तसेच दिवाळीपूर्वीच सर्व विभागांची स्वच्छता झाली पाहिजे, असे आदेश दिले.
दीपककुमार मीणा यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्यासह मुख्यालयातील पदाधिकाºयांच्या कक्षांना भेटी देऊन पाहणी केली. बांधकाम विभाग दोन व तीन, आरोग्य आणि कृषी विभागात जाऊन पाहणी करीत खातेप्रमुखांना सूचना केल्या. कार्यकारी अभियंता एस. पी. राजगुरू, संजय नारखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांच्या विभागांना भेटी देऊन स्वच्छतेविषयक सूचना केल्या. आरोग्य विभागातील रिकामे लोखंडी कपाटे, तसेच फायलींचे गठ्ठे त्वरित दूर करण्याचे आदेश दिले. कृषी विभागाच्या तळमजल्यावरील गुदामातील अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या नस्त्यांचे गठ्ठे त्वरित साफ करून ते गुदाम मोकळे करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले. स्वच्छतेचे काम करणाºया कर्मचाºयांना हातमोजे, तोंडाला लावण्याचे मास्क पुरविण्याच्या सूचना डॉ. सुशील वाकचौरे यांना दिल्या. कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना मुख्य इमारतीला जेथे गळतीमुळे भिंतींना तडे गेले आहेत, तेथे दुरुस्ती तसेच संपूर्ण इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना केल्या. दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी तत्काळ सेसचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले. शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्षात
जाऊन त्यांनी पगार यांच्याशी चर्चा करीत दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. दोन ते तीन लाखांत हे सर्व होईल, असे सिद्धार्थ तांबे यांनी सांगितले.