सर्वेक्षणास आलेल्या अधिकाºयांना डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:36 PM2017-08-03T23:36:37+5:302017-08-04T00:10:54+5:30
घोटी : तळोशी गावात समृद्धी महामार्गासाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी कोंडून ठेवले. या कामाला आमचा विरोध असतानाही शासन अधिकाºयांना मोजमाप करण्यासाठी का पाठवत आहे, असा सवाल करून रोष व्यक्त केला.

यावेळी रस्ता मोजण्यासाठी कृषी अधिकारी पाटील, जगताप, विसपुते, जोशी यांना शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना तब्बल चार तास डांबून ठेवण्यात आले. समृद्धी महामार्गास एकीकडे थेट खरेदी सुरू केली; मात्र दुसरीकडे शेतकºयांचा विरोध काही मावळताना दिसत नाही. अधिकारीवर्गाने तोडगा काढून शेतकºयांनी कामकाजाच्या विरोधाचे निवेदन दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, शरद गुंजाळ, भिका गिते, मंगेश गिते, खंडू शेळके, सुनील गुंजाळ, रमेश गुंजाळ, संतोष खातळे, लक्ष्मण गुंजाळ, तानाजी शिंदे, बळवंता गुंजाळ, रेवन्नाथ सोनवणे, संपत गुंजाळ, रामदास गिते, शिवाजी गुंजाळ, भगीरथ राव, संजय गुंजाळ, सोपान गुंजाळ, किसन गिते, पोपट गुंजाळ, कचरू गिते, समाधान गिते, सोमनाथ गिते, ज्ञानेश्वर गुंजाळ आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़