अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:34 AM2018-10-13T01:34:56+5:302018-10-13T01:35:21+5:30

सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.

The officials work to co-ordinate | अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

Next
ठळक मुद्देगिरीश बापट : पुरवठा खात्याच्या प्रश्नावर अधिकारी, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक

नाशिक : सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची संयुक्तबैठक पुरवठा खात्याच्या प्रश्नावर घेण्यात आली त्यावेळी ते पुढे म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सर्वसामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. राज्यात भेसळमुक्त अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. बंदी असलेल्या औषधांसंदर्भातदेखील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसात सामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थांचा वापर करता यावा यासाठी छोट्या विक्रेत्यांना तसेच कामगारांना स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. अवैध मार्गाने विक्री होणाºया गुटखा व मादक पदार्थांवर प्रतिबंध आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महसूल व पोलीस विभागाने समन्वीतरीत्या प्रयत्न करावे, असे निर्देशही बापट यांनी दिले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, आसिफ शेख, डॉ. राहुल अहेर, जयवंत जाधव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यू काळे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते.

Web Title: The officials work to co-ordinate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.