जिल्हा परिषदेच्या दीड लाख विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:09+5:302021-07-25T04:14:09+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठीच ऑफलाईन व ऑनलाईन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची ...

Offline education to 1.5 lakh Zilla Parishad students | जिल्हा परिषदेच्या दीड लाख विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण

जिल्हा परिषदेच्या दीड लाख विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण

Next

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठीच ऑफलाईन व ऑनलाईन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची असलेली कमतरता व इंटरनेटची रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी पाहता ऑफलाईन शिक्षण घेण्याकडे मोठा कल असल्याचे म्हसकर यांनी सांगितले. शिकविण्यासाठी शिक्षकही पाडे, वाडे, वस्तीवर उपस्थित राहात असून, त्यांनाही कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. चौकट==== खात्यांची माहिती दिल्यावर पैसे वर्ग

पोषण आहाराची रक्कम विद्यार्थी व पालकांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. सर्व शंभर टक्के खात्यांची माहिती गोळा झाल्यावर ती शासनाला पाठविण्यात येईल व त्यानंतर शासन परस्पर पैसे वर्ग करणार असल्याची माहितीही म्हसकर यांनी दिली.

Web Title: Offline education to 1.5 lakh Zilla Parishad students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.