राज्यशासनाच्या विरोधात संस्थाचालकांचे शाळाबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:38 PM2018-08-02T15:38:38+5:302018-08-02T15:39:07+5:30

नामपूर : राज्य शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांची बैठक पुणे येथे दि. ४ आॅगस्ट रोजी होत असून त्यामध्ये दि. ७ ,८ ,९ आॉगस्ट या तिन दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Offshore movement against the state government | राज्यशासनाच्या विरोधात संस्थाचालकांचे शाळाबंद आंदोलन

राज्यशासनाच्या विरोधात संस्थाचालकांचे शाळाबंद आंदोलन

googlenewsNext

नामपूर : राज्य शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांची बैठक पुणे येथे दि. ४ आॅगस्ट रोजी होत असून त्यामध्ये दि. ७ ,८ ,९ आॉगस्ट या तिन दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्य कर्मचारी महासंघ सुध्दा उतरणार आहे.
२०१२ नंतर शिक्षण क्षेञातिल कर्मचाऱ्यांची भरती बंद असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी कर्मचाºयांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाचे कोठलेही अनुदान नसतांना संस्थाचालक पदरमोड करु न या शिक्षकांना अल्पसे का होईना वेतन देत आहेत. मात्र आता ५ ते ६ वर्ष उलटूनही शासन या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा कुठलाही निर्णय घेत नाही. म्हणून तिन दिवस शाळा बंद आदोलन होणार आहे . सर्वांनी यात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शिक्षकभारतीचे राजेन्द्र लोंढे, एस. बी देशमुख, गुफराण अन्सारी, डी यु अहिरे, शरद नेरकर, सुरेश शेलार, शामकांत चव्हाण ,संकेत शिरोळे यांनी केले आहे.
----
संपातील प्रमुख मागण्या
* ०२ मे २०१२ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना म्हणजेच प्राथमिक , माध्यमिक आण िउच्च माध्यमिक शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वैयक्तिक मान्यता द्याव्यात.
*शिक्षकभरतीचे सर्व आधिकार शालेय कोड मधील तरतुदी प्रमाणे संस्था चालकाकडेच ठेवावे.
* वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ शालार्थ मान्यता द्याव्यात आणि त्याचे वेतन सुरु करावे.
*शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती पुर्ववत सुरु करावी.
*वेतनेत्तर अनुदान पुर्वीप्रमानेच १२ टक्का द्यावे.
* विनाआनुदित तत्वावरील शाळांचे त्वरित मुल्यांकन करु न सरसकट १०० टक्के अनुदान द्यावे.

Web Title: Offshore movement against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक