मनपा कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:58 PM2018-04-18T23:58:27+5:302018-04-18T23:58:27+5:30

आझादनगर (मालेगाव) : शहरातील भंगार बाजार रस्त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने एजाज बेग अब्दुल रज्जाक बेग (४०) या इसमाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा पहिला बळी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या सोमवारी मृताच्या पत्नीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला

Often death of NMC employee? | मनपा कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू?

मनपा कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू?

Next
ठळक मुद्देमृताच्या पत्नीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाचक्कर येऊन पडल्याने एजाज बेग अब्दुल रज्जाक बेग इसमाचा मृत्यू

आझादनगर (मालेगाव) : शहरातील भंगार बाजार रस्त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने एजाज बेग अब्दुल रज्जाक बेग (४०) या इसमाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा पहिला बळी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या सोमवारी मृताच्या पत्नीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आज दुपारी ३ वाजता इस्लामपुरा भागातील भंगार बाजार येथे बेग हा चक्क येऊन पडला होता. त्याला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता त्यास डॉ. पवार यांनी मयत घोषित केले. एजाज बेग हा मनपाच्या इस्लामपुरा वॉर्डात सफाई कर्मचारी होता. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.  गेल्या सहा महिन्यापासून तो गैरहजर होता. चार ते पाच दिवसापूर्वीच त्याची पत्नी रिजवाना एजाज बेग हिने विषप्राशन केले होते. तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला होता. बालकांचे मातृ व पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार टी. एच. खांडेकर करीत आहेत.

Web Title: Often death of NMC employee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.