बदनामी टाळण्यासाठी तेल कंपन्या सरसावल्या : पंपांवर इंधन मोजण्यासाठी साधन

By admin | Published: July 8, 2017 08:04 PM2017-07-08T20:04:12+5:302017-07-08T20:04:12+5:30

गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे देशभरातील वाहनचालकांचे डोळे खाडकन उघडले

Oil companies have been asked to avoid defamation: the means for measuring fuel on the pumps | बदनामी टाळण्यासाठी तेल कंपन्या सरसावल्या : पंपांवर इंधन मोजण्यासाठी साधन

बदनामी टाळण्यासाठी तेल कंपन्या सरसावल्या : पंपांवर इंधन मोजण्यासाठी साधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पेट्रोलपंपाच्या यंत्राच्या चीप बसवून केल्या जाणाऱ्या इंधनचोरीचे लोण राज्यात पसरल्यानंतर ठाणे पोलिसांकडून ठिकठिकाणच्या पेट्रोलपंपांची होत असलेली तपासणी व त्यातून तेल कंपन्यांची होणारी बदनामी पाहता इंडियन आॅइल या तेल कंपनीने स्वत:हून पुढे होत आपल्या कंपनीच्या पेट्रोलपंपाविषयी वाहनचालकांना इंधनचोरीची शंका असेल तर त्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपचालकांना इंधन मोजण्यासाठी मापे तसेच त्याच्या दर्जाची खात्री करण्यासाठी ह्यफिल्टरह्णपेपरचे वाटप सुरू केले आहे. कंपनीने या उपक्रमाला ह्चेक अ‍ॅण्ड वीनह्ण असे नाव दिले आहे.
गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे देशभरातील वाहनचालकांचे डोळे खाडकन उघडले असून, अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असताना त्यात पैसे मोजूनही पुरेसे इंधन पेट्रोलपंपावरून टाकले जात नसल्याची बाब सर्वच पेट्रोलपंपचालकांना संशयाच्या भोवऱ्यात उभी करणारी ठरली आहे. ठाणे पोलिसांनी या संदर्भात पुणे, ठाणे, डोंबिवली, शहापूर, नाशिक या ठिकाणी छापे मारून केलेल्या पेट्रोलपंपाच्या तपासणीत इंडियन आॅइल कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम या प्रमुख तीन तेल कंपन्यांचे पंप दोषी आढळून आल्याने त्यांना सील ठोकण्यात आले आहे. तपासणी पथकांनी पेट्रोलपंपावरील यंत्राची तपासणी केली असता त्यात पंपचालकांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने काही पंपाचे ह्यपल्सरकार्डह्ण तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. या कृतीमुळे तेल कंपन्यांची बदनामी तर होतच आहे, परंतु पंपचालकांच्या इंधनचोरीचा आर्थिक फटका तेल कंपन्यांनाही ग्राहक घटल्यामुळे होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इंडियन आॅइल कार्पोरेशन या तेल कंपनीने आपल्या देशभरातील पंपचालकांना या साऱ्या गैरप्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन तर केलेच, परंतु ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या दामाइतके दर्जा प्राप्त इंधन मिळावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रत्येक पंपचालकाला इंधन मोजण्याचे पाच लिटरचे माप तसेच फिल्टर पेपरचे वाटप सुरू केले आहे. ज्या ग्राहकाला इंडियन आॅइल कंपनीच्या पंपावर इंधन कमी मिळत असल्याची तक्रार असेल त्यांनी मागणी केल्यास पंपचालकाने तत्काळ पाच लिटर इंधन मोजमाप साहित्यात मोजून देण्याची सक्ती केली आहे. जर इंधनात तफावत आढळल्यास तत्काळ विक्री प्रतिनिधी तसेच वैधमापन विभागाशी ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय इंधनाच्या दर्जाबाबत तक्रार असेल तर पंपचालकांकडे त्याची सत्यता पटवून देण्यासाठी ह्यफिल्टर पेपरह्ण ठेवण्यात आले असून, कोणताही ग्राहक असा पेपर मागवून त्याआधारे इंधनाचा दर्जा तपासू शकणार आहे.
नाशिक जिल्ह्यात इंडियन आॅइल कार्पोरेशनचे १०४ पेट्रोलपंप असून, गेल्या सप्ताहात कंपनीने ह्यचेक अ‍ॅण्ड वीनह्णया उपक्रमाला सुरुवात केली आहे. कंपनीने या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले असून, पंपचालकांना लोकप्रतिनिधींच्या हस्तेच साधनांचे वाटप केले जात आहे.

Web Title: Oil companies have been asked to avoid defamation: the means for measuring fuel on the pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.