खाद्य तेलाने महागाईत ओतले तेल ७० ते ८० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:47+5:302021-04-01T04:15:47+5:30

युक्रेनमध्ये झालेला संप परदेशात वाढलेली मागणी आणि चीनने मोठ्या प्रमाणात सुरु केलेली खरेदी या कारणांमुळे खाद्यतेलाचे दर वाढले ...

Oil prices rise by Rs 70-80 | खाद्य तेलाने महागाईत ओतले तेल ७० ते ८० रुपयांनी वाढ

खाद्य तेलाने महागाईत ओतले तेल ७० ते ८० रुपयांनी वाढ

Next

युक्रेनमध्ये झालेला संप परदेशात वाढलेली मागणी आणि चीनने मोठ्या प्रमाणात सुरु केलेली खरेदी या कारणांमुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खाद्य तेल उपलब्ध आहे पण मागणीही कमी झालेली नाही. मलेशियात माल कमी असून आपल्याकडील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आदी वेगवेगळ्या करणांमुळे तेलाचे दर वाढले आहेत. - अनिल बुब . व्यापारी

कोट-

कोरोनामुळे आधीच वेतन कपात झाली आहे. त्यात तेलाचे दर वाढल्याने महिनाभराच्या तेलाच्या खरेदीचे बजेट वाढले आहे. तेलाच्या किमती करणे गरजेचे आहे. - प्रमिला निकम, गृहिणी

कोट-

पेट्रोल डिझेलच्या किमती रोज वाढत असताना त्यात आता तेलाची भर पडली आहे. वर्षभरापासून सातत्याने तेलाच्या किमती वाढत असल्याने भाजीला किती तेल वापरावे असा प्रश्न निर्माण होतो. - रजनी देवरे, गृहिणी

कोट-

स्वयंपाक घरात तेल ही आवश्यक बाब आहे. कितीही काटकसर केली तरी आवश्यक तेवढे खाद्यतेल घ्यावेच लागते. आधीच आर्थिक संकट त्यात महागाईचा भडका यामुळे सर्वसामान्याना तारेवरची कसरत करावी लागते. - शालिनी जाधव, गृहिणी

Web Title: Oil prices rise by Rs 70-80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.