ओझर नगर परिषदेचे कामकाज दोन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:02+5:302021-09-09T04:19:02+5:30

तक्रारदार मुख्याधिकारी नगर परिषद /सरपंच, ग्रामपंचायत ओझर नगर परिषद अशा अर्जावर एकत्रितपणे उल्लेख करून समस्या, अडचणी बाबत ...

Ojhar Municipal Council has been closed for two months | ओझर नगर परिषदेचे कामकाज दोन महिन्यांपासून ठप्प

ओझर नगर परिषदेचे कामकाज दोन महिन्यांपासून ठप्प

Next

तक्रारदार मुख्याधिकारी नगर परिषद /सरपंच, ग्रामपंचायत ओझर नगर परिषद अशा अर्जावर एकत्रितपणे उल्लेख करून समस्या, अडचणी बाबत तक्रार अर्ज कार्यालयात देत आहेत. नगरपरिषदबाबत सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या स्पर्धेत जनतेचे होणारी फरपट थांबवावी, अशी सर्वसाधारण नागरिकांची अपेक्षा आहे. एकमेकांना सरस ठरण्याच्या राजकीय नेत्यांच्या स्पर्धेत असलेला ओझरला नगर परिषद की ग्रामपंचायत हा प्रतिष्ठेचा बनलेला प्रश्न आता शासन आणि न्यायालय यांच्या निकालावर अवलंबून आहे. सध्या तरी या टांगत्या तलवारीमुळे दोन अडीच महिन्यांपासून नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज ठप्प आहे. सध्या तर नागरी समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यात प्रामुख्याने ओझरसह परिसरात दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक पथदीप बंद परिस्थितीत आहे. अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. डिझेलअभावी घंटागाडी पाच दिवसांपासून बंद आहेत. ओझर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असेन नागरिक त्रस्त आहेत. यापैकी काही समस्यांबाबत नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात तक्रार अर्ज दिले आहे. पण नगर परिषदमध्ये अधिकार प्राप्त अधिकारी नसल्यामुळे कामाची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश देणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. नगर परिषद कार्यालय कर्मचाऱ्यांना पाणीपट्टी घरपट्टी आदीसह करवसुली करण्याचा अधिकार आहे. परंतु खर्च करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी लागणारे साहित्य कार्यालयात शिल्लक नाही आणि नवीन साहित्य खरेदी करता येत नाही. घंटागाडीची ठेकेदारी मुदत संपलेली आहे ही बाब लक्षात आल्यावर मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी ठेकेदारास समजावून सांगत केलेल्या विनंतीनुसार घंटागाडी गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. परंतु आता पेट्रोलपंप घंटागाडीस डिझेलपुरवठा करीत नाही. त्यामुळे गेल्या पाच सहा दिवसापासून घंटागाडी बंद आहे. नागरिकांनी कचरा कोठे टाकायचा, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. कचरा घराच्या जवळ साठल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नागरिकांनी बोलून दाखविली.

इन्फो

नगरपरिषद की ग्रामपंचायत

ओझरला नगरपरिषद की ग्रामपंचायत याबाबत न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत मात्र सर्व सामान्य जनता भरडली जात असून त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासन व न्यायालयाने नगरपरिषद की ग्रामपंचायत याचा निकाल लावावा व कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरू करुन नागरिकांची होणारी फरपट थांबवावी

अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

फोटो- ०८ ओझर नगरपरिषद

080921\08nsk_24_08092021_13.jpg

फोटो- ०८ ओझर नगरपरिषद 

Web Title: Ojhar Municipal Council has been closed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.