ओझरकरांनी शिबिराद्वारे केले ६४ पिशवी रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 09:16 PM2021-04-04T21:16:00+5:302021-04-04T21:16:25+5:30
ओझर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझरकर नागरिकांनी ६४ पिशवी रक्त संकलन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यासाठी हातभार लावला आहे.
ओझर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझरकर नागरिकांनी ६४ पिशवी रक्त संकलन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यासाठी हातभार लावला आहे.
राज्यातील अत्यल्प कमी रक्तसाठा असल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता येथील समस्त व्यापारी असोसिएशन व ओझरकर नागरिकांच्या वतीने कालिका माता मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी यतीन कदम, पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, पोलीस उपनिरीक्षक गणपत जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीपासूनच आलेल्या रक्तदात्यांचे थर्मल स्कॅनिंग करत तापमान मोजण्यात आले तसेच सॅनिटायझरचा वापर करत कोरोनाच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करत रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी एकूण ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.