काळाराम मंदिर दरवाजासमोरचा वृक्ष कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 02:51 PM2020-06-13T14:51:05+5:302020-06-13T15:37:33+5:30
पंचवटी : श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा समोर उद्यानालगत असलेला अनेक घटनांचा साक्षिदार पुरातन पिंपळ वृक्ष शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत व वित्तहानी झाली नाही. सदर वृक्ष काळाराम मंदिर पूर्व दरवाजाच्या बाहेर भिंतीवर कोसळला आहे. शुक्रवारी (दि. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष भोवती असलेला परिसर पाण्याने भिजला गेला व त्यातच झाडाचा बुंधा मोकळा केल्याने सदर झाड कोसळले.

गेल्या काही दिवसांपासुन काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा समोरील परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र मंदिरासमोर खोदकाम करताना जमीनीखाली चबुतरा आणि पुरातन पायऱ्या आढळून आल्याने पुरातत्व खात्याच्या सुचनेवरून सुशोभिकरणाचे काम बंद करण्यात आले आहे. राम मंदिरासमोरच लहान उद्यान असून या उद्यानात अनेक प्रकारची झाडे आहेत. उद्यानाच्या संरक्षक भिंती लगत पुरातन पिंपळवृक्ष होते. काही दिवसांपासून या परिसरात काम सुरू असल्याने रस्त्यात मध्यभागी असलेल्या पिंपळवृक्षा भोवतीचा मातीचा भर मोकळा करण्यात आला आहे. त्यातच शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे भिजला गेल्याने व झाडाचा बुंधा मोकळा असल्याने सदरचा हवेच्या झोक्यात तो कोसळला. मुळात सदरचा वृक्ष रस्त्यात अडथळा ठरत होता त्यामुळे तो पडावा यासाठीच झाडाचा बुंधा मोकळा केल्याचा आरोप परिसरात राहणा-या नागरिकांनी केला आहे.
श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर असलेल्या परिसरात वृक्ष कोसळल्याची माहिती पंचवटी उद्यान विभागाला कळविण्यात आल्यानंतर उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वृक्षाच्या फांद्या बाजूला काढण्याचे काम केले काही वर्षांपूर्वी काळाराम मंदिर पूर्व दरवाजा जवळ असलेले पुरातन वटवृक्ष कोसळण्याची घटना घडली होती.