जुने सीबीएस आता महापालिकेला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:55 AM2019-01-13T00:55:58+5:302019-01-13T00:57:37+5:30

शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे.

Old CBS will now get NMC | जुने सीबीएस आता महापालिकेला मिळणार

जुने सीबीएस आता महापालिकेला मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देशहर बसची तयारीदोन बस डेपोंसाठी महामंडळाशी करार

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. एकूण दोन डेपो महापालिकेस मिळणार असून, त्यासंदर्भात महामंडळाशी करार करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहर बस सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या महासभेतील ठराव प्राप्त झाल्यानंतर आता प्रशासनाने यासंदर्भातील कार्यवाही गतिमान केली आहे. बससेवेसाठी कंपनी स्थापन करण्याच्या कामाला वेग देतानाच निविदा काढण्यासाठीदेखील प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे बससेवेसाठी आवश्यक ते डेपो आणि बस थांबे तयार करणे, बसच्या मार्गिका निश्चित करणे याबरोबरच अन्य कामेदेखील सुरू आहेत.
बससेवा सुरू करताना महापालिकेच्या वतीने आपल्या ताब्यातील भूखंड बसस्थानक म्हणून विकसित करण्यासाठी तयारी केली आहे. एकूण चार बसस्थानके तयार करण्यात येणार असून, त्यातील दोन स्थानके पीपीपीमधून विकसित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून दोन भूखंड घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार त्यांनी जयभवानी रोडवरील आनंदनगर येथील डेपोची जागा तसेच शहराच्या अत्यंत मध्यवस्तीतील सीबीएस हा ग्रामीण भागासाठी वापरलेला डेपो देण्याची तयारी दर्शविली आहे. हा भूखंड कसा द्यायचा वगैरे तपशील ठरायचे आहेत, परंतु लवकरच यासंदर्भात महामंडळाशी करार करण्यात येणार आहे.
जुने सीबीएस येथे या डेपोबरोबरच महामंडळाकडे मेळा स्थानक आणि ठक्कर बाजार असे दोन डेपो असून, महामंडळाला ग्रामीण आणि अन्य ठिकाणी बससेवा पाठविण्यासाठी ते पुरेसे आहेत, त्यामुळे त्यांनी जुने सीबीएसचा डेपो देण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Old CBS will now get NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.