योजना जुनी तरीही नव्या अर्जाची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:26 AM2020-02-17T01:26:37+5:302020-02-17T01:27:17+5:30

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजना क्रमांक तीनसाठी नव्याने अर्ज करण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांना पाठपुराव्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

The old-fashioned scheme still forces new applications | योजना जुनी तरीही नव्या अर्जाची सक्ती

मनपा उपायुक्त अर्चना तांबे यांना निवेदन देताना बबलू मिर्झा, पंकज सूर्यवंशी, रवींद्र टिळे, ललित पवार आदी

Next

नाशिक : महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजना क्रमांक तीनसाठी नव्याने अर्ज करण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांना पाठपुराव्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
यासंदर्भात प्रहार अपंग क्र ांती आंदोलन व दिव्यांग कल्याणकारी संघटना नाशिक यांनी दिव्यांग कल्याण संघटना नाशिक यांच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त अर्चना तांबे यांना निवेदन देण्यात आले.
दरमहा दोन हजार रु पये अनुदान मिळत होते. परंतु मनपाने नवीन वर्षी या योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा नवीन अर्ज करण्यास सांगितल्याने दिव्यांग व्यक्तींना धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी नव्याने अर्ज न मागवता फक्त दिव्यांगांच्या हयातीचा दाखला घेण्यात यावा आणि योजना निरंतर सुरू ठेवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी प्रहार अपंग क्र ांती आंदोलन नाशिकचे शहराध्यक्ष ललित पवार, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा, प्रहारचे जिल्हा सचिव पंकज सूर्यवंशी, रवींद्र टिळे उपस्थित होते.

Web Title: The old-fashioned scheme still forces new applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.