जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:18 PM2019-07-31T17:18:21+5:302019-07-31T17:18:46+5:30

रस्त्याला सुमारे ३०० ते ४०० मीटर इतके तडे

Old highway crosses highway | जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे

जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे

googlenewsNext
ठळक मुद्देकसारा घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस

इगतपुरी : जुन्या कसारा घाटातील मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर रस्त्याला तडे गेल्याने घाटातील वाहतूक वळविण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यासह परिसरात गेल्यात चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे रस्ता खचल्याचे सांगितले जात असले तरी निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.
जुन्या कसारा घाटातील महामार्गावरील रस्त्याला सुमारे ३०० ते ४०० मीटर इतके तडे गेले असून त्यामुळे सदर भाग धोकादायक बनला आहे. कसारा घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यापूर्वी पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे बोगद्याजवळ मातीचा ढिगारा येऊन कोसळला होता. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती तर मागील आठवड्यात रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळल्याने गोदावरी एक्सप्रेसचा अपघात टळला होता. आता महामार्गाला तडे गेल्याने रस्ता दुरुस्त करण्यासाठी काम सुरू असून जुना कसारा घाटातील मुंबईहुन नाशिकला येणारी वाहतुक नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या नवीन घाटातुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकाची तारांबळ उडताना दिसून येत आहे.

Web Title: Old highway crosses highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.