वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:31 IST2020-08-27T19:28:56+5:302020-08-27T19:31:35+5:30
वणी : वणी-कळवण रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दूधाची वाहतूक करणाºया टॅँकरने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कळवण चौफुलीवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार
ठळक मुद्देपोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.
वणी : वणी-कळवण रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दूधाची वाहतूक करणाºया टॅँकरने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कळवण चौफुलीवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
वामन राघो धूम (६५, रा. बोरीचा पाडा) हे दुपारच्या सुमारास कळवण चौफुली परिसरातून पायी जात असताना दूध वाहतूक करणाºया टॅँकरने (क्र. एमएच १७ एजी ०५००) त्यांना धडक दिली. यात धूम जागीच ठार झाले. अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.