जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:27 PM2020-06-07T22:27:28+5:302020-06-07T22:29:36+5:30

दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Old Nashik 'hotspot': 61 corona patients found in the city | जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण

जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण

Next
ठळक मुद्देनाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्णमोठ्या धोक्याची घंटा ठरू शकतेमनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान शहराचा आकडा आता ४२७ पर्यंत पोहचला

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला असून रविवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. शहराचा आकडा आता ४२७ पर्यंत पोहचला आहे. यापैकी २४ रुग्ण जुने नाशिक भागात आहेत. जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्ण मिळून आले. दोन दिवसांपुर्वीच नाईकवाडीपुरा भागात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. शहरातील एकूणच व्यवहार सुरळीत होत असून शनिवारी शहरातील बाजारपेठा अचानकपणे गजबजून गेलेल्या दिसून आल्या. लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आणि कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारकडून सुचविलेले सर्वच उपाययोजना आणि नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र पहावयास मिळाले, जर अशीच परिस्थिती राहिली तर ही मोठ्या धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
--
...येथे आढळले आज ६१ रूग्ण
नाईकवाडीपुरा - १० पुरूष ९ महिला
कोकणीपुरा - १
दुधबाजार-त्र्यंबक दरवाजा-१
बागवानपुरा-१
मदिना चौक -३
भाभानगर- १
वडाळारोड-१
पखालरोड- ७
स्वास्तिकनगर (पखालरोड)-१
टाकळीरोड - ४
काठेगल्ली- २
अशोकामार्ग-१
राजरत्ननगर (सिडको)-२
शिवशक्ती चौक-१
सातपूर कॉलनी- ५
सातपूर-१
दिंडोरीरोड-१
भगवतीनगर, हिरावाडी-२
भराडवाडी- २ (महिलेसह ६ महिन्याचे तान्हुळे बाळ)
स्नेहनगर, म्हसरूळ - ३
खासगी रुग्णालय (साईनाथनगर)-२







 

Web Title: Old Nashik 'hotspot': 61 corona patients found in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.