खेडगावी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:44 PM2019-06-25T18:44:53+5:302019-06-25T18:45:09+5:30
खेडगाव : मविप्र समाज संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या (१९५९ ते २०१९) विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा भेट घडावी व सुसंवाद व्हावा या उद्देशाने या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. त्यामुळे जुन्या मित्रांची पुन्हा एकदा शाळा भरल्याची अनुभूती आली.
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अॅड.भास्करराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, चिटणीस सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे, सेवक संचालक नंदाताई सोनवणे, खेडगाव शाळेचे पहिले मुख्याध्यापक विठ्ठल ढोकरे आदी उपस्थित होते. या मेळाव्यास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील विविध मजेशीर गंमतीजमती, आठवणी व अनुभव कथन केले. माजी ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या सुसज्जेसाठी शाळेला देणगी स्वरु पात मदतही केली. याप्रसंगी दिंडोरी पेठ तालुका मविप्र संचालक दत्तात्रय पाटील, शालेय समिती अध्यक्ष अनिल ठुबे, राजेंद्र ढोकरे पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. कारे, के. पी. गांगुर्डे, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक व शिक्षकवृंद उपस्थित होते.