लिफ्टच्या बहाण्याने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:23 AM2017-09-03T01:23:23+5:302017-09-03T01:23:47+5:30
बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या सईबाई बोडके (५५) या महिलेसोबत संशयित कदम याने ओळख करून घेत तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून आडगाव शिवारातील म्हसरूळ -आडगाव लिंकरोडवर नेले़ याठिकाणी बोडके यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या काढून घेतल्याची घटना मंगळवारी (दि़२९) दुपारी घडली होती़ या घटनेस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा बुधवारी (दि़ ३०) पुन्हा पिंपळगाव येथील विठाबाई रघुनाथ मोरे (६६) या वृद्धेस घरी सोडण्याच्या बहाण्याने कदम याने नवव्या मैलावर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पोत लुटून नेली होती़ वृद्धांना लुटण्याच्या या दोन घटनांनंतर आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच ग्रामीण भागातील रिक्षा तसेच बसस्टॉपवर पाळत ठेवली जात होती़ त्यातच गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित कदम यास अटक केली़ त्याच्याकडून विठाबाई मोरे यांची लूट केलेली सोन्याची पाच तोळ्याची पोतही जप्त करण्यात आली आहे़ संशयित कदम याने ओझर तसेच आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ आडगाव गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस हवालदार मुनीरोद्दीन काझी, पोलीस नाईक अनिल केदारे, पोलीस शिपाई मनोज खैरे, वैभव खांडेकर, नकुल जाधव यांनी ही कामगिरी केली़