ओम नम: शिवाय... ओम नम: शिवाय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:32 AM2019-03-05T01:32:18+5:302019-03-05T01:32:34+5:30
ओम नम: शिवाय.. ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवायच्या गजरामध्ये परिसरातील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर भाविकांनी पूजा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
नाशिकरोड : ओम नम: शिवाय.. ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवायच्या गजरामध्ये परिसरातील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर भाविकांनी पूजा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त चेहेडी पंपिंग येथील वालदेवी-दारणा नदी संगमावरील श्री संगमेश्वर महादेव मंदिर, मुक्तिधाम, श्री दुर्गा देवी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बिर्ला मंदिर, देवळाली गावातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, धनगर गल्लीतील श्री महादेव मंदिर, देवळालीगाव श्री गणपती विसर्जन स्थान येथील श्री महादेव मंदिरात सोमवारी सकाळपासून भाविकांनी पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी झाली होती. आनंदनगर येथे जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त श्री महादेवाच्या पिंडीचा देखावा साकारण्यात आला होता. दिवसभर धार्मिक गीते लावून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विहितगाव श्री विठ्ठल मंदिराजवळील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी मांडव डहाळेची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, नगरसेविका सुनीता कोठुळे आदींच्या हस्ते पूजा करण्यात आली.
देवळालीगावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त महाशिवरात्रीला पंचकमिटीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, सूर्यभान घाडगे, रूंजा पाटोळे, कैलास चव्हाण, पुंडलिक खोले, संपत खोले, महेश देशमुख, नगरसेवक सूर्यकांत लवटे आदींच्या हस्ते श्री म्हसोबा मूर्तीला महाअभिषेक करून दागिने अर्पण करण्यात आले.
जेलरोड लोखंडे मळा येथील श्री महादेव मंदिरात सकाळी महापूजा करून दिवसभर खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी पार्वताताई लोखंडे, छगनराव लोखंडे, विलास लोखंडे, विलासराज गायकवाड, अमोल मोरे, सचिन चव्हाण, विनता लोखंडे, शरद साळवे, सोनू जाधव, विनोद जाधव, ज्ञानेश्वर थित्ते आदी उपस्थित होते.
जेलरोडच्या नांदूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात सोमवारी दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. ओम गुरुदेव माउली भक्त मंडळ व मनसेचे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले यांच्यातर्फे दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल ढिकले, गिरीश जगताप, विक्रम खरोटे, सागर भोजने, दिनेश नाचन, संतोष मते, विजू भिसे, देवीदास गांगुर्डे, प्रवीण बागुल, संतोष नरवडे, दीपक वर्पे, कैलास नरवडे, रोहिणी पिल्ले, अनिता पिल्ले, सुरेखा गांगुर्डे, सुनीता डोखे, सीता रेड्डी, उज्ज्वला जाधव, सिद्धार्थ रणशूर, विशाल पिल्ले, प्रेम भदाने, सुनील भंडारी आदी उपस्थित होते.
जेलरोड समर्थनगरमधील नागेश्वर महादेव मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा करून महाआरती करण्यात आली. महादेव महिला मंडळाने हरिपाठ पारायण व हभप शरद महाराज सालगावकर यांनी कीर्तन सादर केले.
यावेळी रामदास महाराज दुबे, भानुदास महाराज दुबे, राजू महाराज गायखे, शिवा महाराज दुबे, संजय ढिकले, बाळासाहेब शिंदे, सुरज ढिकले, अजिंक्य ढिकले आदींची उपस्थिती होती.