नाशिक: अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांनी वाचविले महिला व मुलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2022 07:53 PM2022-09-09T19:53:27+5:302022-09-09T19:55:46+5:30

मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत होते असल्याचे सांगितले.

on anant chaturdashi saikheda police saved the lives of a woman and a child | नाशिक: अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांनी वाचविले महिला व मुलाचे प्राण

नाशिक: अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांनी वाचविले महिला व मुलाचे प्राण

googlenewsNext

सायखेडा जि नाशिक (एस बी कमानकर)

निफाड तालुक्यातील ब्राम्हणवडे येथील कौटुंबिक समस्येला कंटाळत आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला सायखेडा पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळत अनंत चतुर्दशी ला सायखेडा पोलिसांच्या रुपात विघ्नहर्ता आल्याचे दिसून आले.सदर घटना शुक्रवार दि ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली.  

अनंत चतुर्दशीनिमित्त सकाळी सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी हे गोदावरी नदी वरील सायखेडा पुलावर बंदोबस्ताची पाहणी करत असतांना पुलाच्या बाजूने ब्राम्हणवाडे ता निफाड येथील पल्लवी उर्फ ताई गोरख माळी वय २८ वर्षे आपला मुलगा नाव रोहित वय ५ वर्षे सह पळत आली.आणि मुलाला काखेत घेत मुलासह उडी मारणार तोच सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी महिलेकडे बघत उडी मारू नको म्हणत धाव घेतली.त्याच वेळी पुलावर प्रवास करणारे अशपाक शेख,भाऊसाहेब ससाणे सद्दाम शेख हे थांबत महिला पोलीस कर्मचारी उर्मिला काठे यांच्या मदतीला येत आस्थेने विचारपूस करत आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत तिचे मनपरिवर्तन केले.

मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत होते असल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांच्यातील भाऊ जागा जागा होत महिलेसह मुलास नवीन कपडे देत खाऊ भेट दिला. दरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर अनंत चतुर्दशी च्या दिवशी पी वाय कादरी यांच्या रुपात विघ्नहर्ता धावून आल्याचे जाणवले. दरम्यान सायखेडा पोलिसांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.
 

Web Title: on anant chaturdashi saikheda police saved the lives of a woman and a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक