सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे

By अझहर शेख | Published: October 31, 2023 02:14 PM2023-10-31T14:14:08+5:302023-10-31T14:15:09+5:30

नरेंद्र दंडागव्हाळ - नाशिक : 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष करत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सिडकोच्या ...

On behalf of the entire Maratha community, the contact office of MLA Seema Here was knocked down | सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे

सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला ठोकले टाळे

नरेंद्र दंडागव्हाळ -

नाशिक : 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष करत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सिडकोच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या सिडकोच्या संपर्क कार्यालयाला मंगळवारी (दि.31) टाळे ठोकण्यात आले.

सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मराठा समाजाच्या वतीने भाजपाच्या पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा तसेच तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पांठिबा मिळावा या मागणीसाठी त्यांचे सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले. यावेळी आंदोलन करताना एक मराठा लाख मराठा  आमदार सीमाताई  हिरे राजीनामा द्या अशा घोषणा यावेळी आंदोलकांककडून देण्यात आल्या.

यावेळी संजय भामरे, विजय पाटील, योगेश गांगुर्डे, आशिष हिरे, बाळासाहेब गीते, पवन मटाले, सुनील जगताप, प्रीतम भामरे, पंकज पाटील, अक्षय पाटील, संजय जाधव, सागर पाटील, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोटकर, दीपक चव्हाण, अमित खांडे, शरद भामरे, कैलास खांडगे आदींसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
 

Web Title: On behalf of the entire Maratha community, the contact office of MLA Seema Here was knocked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.