टमाटा दीड रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:15 PM2019-12-16T13:15:50+5:302019-12-16T13:16:01+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले .
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले . खोरी फाटा येथे विक्र ीसाठी कळवण , सुरगाणा , दिंडोरी तालुक्यातून टमाटाची मोठया प्रमाणावर मालाची आवाक होत असते. दररोज सकाळी ८ ते ११ पर्यत वणी सापुतारा रोडवरील खोरी फाटा येथे प्रवाश्यांना वाहतुकीचाही सामना करावा लागत असतो. परंतु शेतीचा माल असल्यामुळे काही वेळ कसलीही हुज्जत न करता टमाटाचे भरलेले ट्रॅक्टर , पिकअप सारखे वाहनातून आपला माल विक्र ी साठी आणत असतात. बाजारात (प्रति २० किलो कॅरेट) गोल्टी ते मेडीयम साईज टमाटा २० रु पये ते ३० रूपये, लाल गारसलेला ४० ते १२० रूपये तर नविन माल ८० ते १४० रूपयांपर्यत असल्याचे व्यापारी सांगत आहेत .
बाजारात भाव नसल्यामुळे काही शेतकºयांनी टमाटा पिकावर रोटर फिरवून रब्बीसाठी आपली शेतजमीन तयार केली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे टमाटा आवक कमी झाल्यामुळे बाजारात सुधारणा होत असल्यामुळे ज्यांच्या शेतात टमाटा आहे अशा शेतकºयांना पैसे होणार असे व्यापारी सांगत असले तरी बळीराजा धास्तावला आहे.
नवा टमाटा सुरू झालेल्या राज्यात गुजरात ,खंडेराव पूरा आंबू रोड , इडर, रतलाम ( मध्य प्रदेश ), औरंगाबाद , छत्तीसगड , मध्य प्रदेश बाजारात जुन्या मालाला भाव मिळत नसल्याचे व्यापारी मुकेश चहावाला यांनी सागितले .
जानेवारी महिन्यात अरली द्राक्षबाजारात दाखल होण्याच्या तयारीत असतात म्हणून व्यापारी टमाटा खरेदी करत नाही. त्यांचा द्राक्ष खरेदी कडे कल असल्यामुळे टमाटा जरी बळीराजाकडे असला तरी त्याला घेण्यासाठी व्यापारी नसल्यामुळे बाहेरच्या मार्केटला भाव असला तरी स्थानिक व्यापारी ज्यूस कंपनीसाठी कमीत कमी भावात टमाटा खरेदी करतात.