सटाणा पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांना दीड कोटी अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:32+5:302021-03-30T04:10:32+5:30
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी म्हटले आहे की, सटाणा नगर परिषद क वर्ग नगर परिषद ...
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी म्हटले आहे की, सटाणा नगर परिषद क वर्ग नगर परिषद असून, नगर परिषदेच्या उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. पालिकेच्या सेवेत असलेले ३८ कर्मचारी हे दि. ३१ मे २०१८ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्त कर्मचार्यांना सुमारे एक कोटी ४२ लक्ष ८३ हजार ९३४ रुपये इतकी रक्कम अदा करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेतली.
या अनुषंगाने ५८ लक्ष ३७ हजार २०४ रुपये व उर्वरित उपदानांची रक्कम ८४ लक्ष ४६ हजार ७३० रुपये अदा करण्यासाठी १४व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून वर्ग करून घेण्यासाठी नगर परिषद सभा दि. ४ मार्च रोजी ठराव पारित करण्यात आला. कर्मचार्यांना देय असलेल्या उपदान रकमेपैकी ८४.४६ लक्ष रुपये अदा करण्यात येऊन ३८ कर्मचार्यांची रक्कम अदा करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पोपटराव सोनवणे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहे.
कॅप्शन :२९ सटाणा पालिका
सटाणा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलाच्या रकमेचा धनादेश सेवानिवृत्त कर्मचारी व संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनवणे यांच्याकडे सुपुर्द करताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नितीन सोनवणे, बाळू बागुल, साहेबराव सोनवणे, विजय देवरे, नीलेश बोरसे आदी.
===Photopath===
290321\29nsk_9_29032021_13.jpg
===Caption===
सटाणा नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलाच्या रकमेचा धनादेश सेवानिवृत्त कर्मचारी व संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करतांना नगराध्यक्ष सुनिल मोरे. समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नितीन सोनवणे, बाळू बागूल, साहेबराव सोनवणे, विजय देवरे, निलेश बोरसे आदी.