दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:26 AM2019-09-26T00:26:09+5:302019-09-26T00:47:39+5:30

शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.

 One-and-a-half foot sling found in the shop | दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड

दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड

Next

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.
वृक्षराजींचा आधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला असून, नैसर्गिक ठिकाणांवरही नागरिकांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. परिणामी वन्यजीव अनेकदा वाट चुकून शहरी भागात येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात भटकंती करताना आढळून आले होते. महिनाभरापूर्वी शरणपूररोड येथील एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून घोरपडीचे लहान पिल्लू वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा पूर्ण वाढ झालेली घोरपड एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ पश्चिम नाशिकचे वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, राजेंद्र ठाकरे, इको-एको वन्यजीवप्रेमी संघटनेचे वैभव कुलकर्णी, सुखदा गायधनी आदींनी हार्डवेअरच्या दुकानात पोहचून घोरपड सुरक्षितपणे ताब्यात घेतली. घोरपड तंदुरुस्त असल्यामुळे तिला नैसर्गिक अधिवासात वन कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आले.

Web Title:  One-and-a-half foot sling found in the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक