सप्टेंबरमध्ये डेंग्यू रुग्णांचे दीड शतक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:55 AM2019-10-02T01:55:23+5:302019-10-02T01:57:26+5:30

गतवर्षीच्या तुलनेत एकूणच डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी सप्टेंबर महिन्यात तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ३४२ रुग्ण आढळले असून, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीत साथ वाढत असल्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत.

One and a half hundred dengue patients in September! | सप्टेंबरमध्ये डेंग्यू रुग्णांचे दीड शतक!

सप्टेंबरमध्ये डेंग्यू रुग्णांचे दीड शतक!

Next
ठळक मुद्देगतवर्षीसारखीच स्थिती : संशयित रुग्णांबाबत शंका कायम महापालिकेच्या वतीने जनजागृती

नाशिक : गतवर्षीच्या तुलनेत एकूणच डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी सप्टेंबर महिन्यात तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ३४२ रुग्ण आढळले असून, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीत साथ वाढत असल्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत.
गेल्या महिन्यात सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शहरात १०५ डेंग्यू रुग्ण होते, तर आॅगस्ट महिन्यात सुमारे १२० रुग्ण होते. तथापि, नंतर शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या वाढेल, अशी चिन्हे होती. त्यानुसार ही संख्या वाढली असून, सरत्या महिन्यात १६५ रुण पॉझिटीव्ह आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यातच एकूण ५९४ संशयित डेंग्यू आढळले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातदेखील १६५ रुग्ण आढळले होते, तर ५२० संशयित रुग्ण होते. संपूर्ण वर्षभराचा अंदाज घेतला तर गेल्यावर्षी ८४० डेंग्यू रुग्ण आढळले होते त्या तुलनेत यंदा पन्नास टक्क्यापेक्षा कमी म्हणजेच ३४२ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या वतीने काहीही दावा केला जात असला तरी त्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असून, अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, असेदेखील सांगितले जात आहे.
डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जातात. तसेच विशेष मोहीम राबवून पाणी साठवणीचे ठिकाणे नष्ट केली जातात. घरातील रिकामी भांडी, कुंड्या, फ्लॉवरपॉट, निकामी टायर अशा ठिकाणी पाणी साठले असल्यास सदर पाणी काढून टाकावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
‘त्या’ नागरिकांवर कारवाई नाही?
महापालिकेच्या वतीने डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाईचीदेखील तरतूद आहे. परंतु महापालिकेच्या वतीने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना कारवाई केलेली नाही.
यंदा पावसाळा लांबला, त्यातच तो सलग बरसला नाही. त्यामुळे पाणी साचून डेंग्यू डासांची निर्मिती झाली आहे. महापालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी फवारणी आणि धुराळणीचे काम सुरू असल्याचा दावा असला तरी या कामात अनियमितता आहे. प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरच यासंदर्भात कार्यवाही होते, अशी तक्रार आहे.

Web Title: One and a half hundred dengue patients in September!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.