मक्याला भाव मिळण्यासाठी दीडशे शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:22+5:302021-09-23T04:17:22+5:30
शासनाने मका १८७०, ज्वारी मालदांडी -२७३८, हायब्रीड-२७५८, बाजरी -२२५०, रागी-३३१७ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे हमीभाव जाहीर केला आहे. खरीप हंगामातील ...
शासनाने मका १८७०, ज्वारी मालदांडी -२७३८, हायब्रीड-२७५८, बाजरी -२२५०, रागी-३३१७ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे हमीभाव जाहीर केला आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या खरेदीसाठी जिल्ह्यात एकूण नऊ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर आपला शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी विहित मुदतीत नाव नोंदणी केली आहे, त्यांच्याच मालाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा केंद्रांवर एकूण १५० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. यात मालेगाव तालुक्यातील ७१ आणि देवळा तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. येवला आणि लासलगाव येथील केंद्रांवर अद्याप एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत खरेदी केंद्रांवर नावनोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.