जिल्ह्यात साडेबाराशे गावे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:34+5:302021-07-17T04:12:34+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाट्याने होत असलेले लसीकरण व कोरोनाविषयक घ्यावयाच्या खबरदारीबाबत झालेल्या जागृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना ...

One and a half hundred villages in the district are free from corona | जिल्ह्यात साडेबाराशे गावे कोरोनामुक्त

जिल्ह्यात साडेबाराशे गावे कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाट्याने होत असलेले लसीकरण व कोरोनाविषयक घ्यावयाच्या खबरदारीबाबत झालेल्या जागृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटू लागली असून, जिल्ह्यातील १९२७ गावांपैकी १२४६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत आदिवासी तालुक्यांनाही कवेत घेऊन रुग्ण व मृत्यूची संख्या वाढविणाऱ्या कोरोनाने या भागातूनही काढता पाय घेतल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग जोरात होता. जवळपास दिवसभरात ५३ हजार रुग्णसंख्या गाठण्याबरोबरच दिवसाकाठी ९७ रुग्ण दगावण्याचा विक्रमही याच काळात झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील सुमारे चार लाख नागरिक कोरोनाने बाधित होऊन ३ लाख ८६ हजार ७६७ रुग्ण बरेही झाल्याची दिलासादायक बाब आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कहर माजविणाऱ्या कोरोनाने जून महिन्यापासून थोड्या प्रमाणात उसंत घेतली असली तरी, मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मात्र शासन, आरोग्य यंत्रणा व नागरिकांची परीक्षाच घेतली. हजारोंच्या संख्येने दररोज बाधित होणारे रुग्ण व त्यांना दाखल करण्यासाठी अपुरी पडणारी रुग्णालये, ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटरची उपलब्धता व रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा उपचाराविना मृत्यू झाला. रेमडेसिविरच्या कमतरतेचा फायदा रुग्णालयांनी उचलून त्याचा काळाबाजारही करण्यात आला. या साऱ्या घटना पाहता, कोरोनाने संपूर्ण समाज व्यवस्थेवरच घाला घातल्याचे स्पष्ट झाले.

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू केले असले तरी, लसींचा पुरेसा साठा होत नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होऊ शकलेले नसले तरी, बहुतांशी नागरिकांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. त्यामुळेदेखील कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त ९०३ पॉझिटिव्ह रुग्ण सध्या आहेत.

चौकट====

तालुकानिहाय रुग्ण

* नाशिक- १०८

* बागलाण- ६५

* चांदवड- ८३

* देवळा- २७

* दिंडोरी- ९५

* इगतपुरी- १८

* कळवण- १२

* मालेगाव- ४०

* नांदगाव- ४५

* निफाड- १३३

* पेठ- ०७

* सिन्नर- २०४

* सुरगाणा- ००

* त्र्यंबकेश्वर- ०३

* येवला- ६३

------------

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

* नाशिक- ७७ (४६)

* बागलाण- १७० (१४३)

* चांदवड- ११२ (५६)

* देवळा- ५० (३७)

* दिंडोरी- १५७ (१३१)

* इगतपुरी- १२० (११२)

* कळवण- १५२ (१३२)

* मालेगाव- १४१ (९९)

* नांदगाव- ९९ (७९)

* निफाड- १३७ (९८)

* पेठ- १४५ (१४२)

* सिन्नर- १२८ (२८)

* सुरगाणा- १९० (२८)

* त्र्यंबकेश्वर- १२५ (३०)

* येवला- १२४ (८५)

Web Title: One and a half hundred villages in the district are free from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.