दीड लाख भाविकांची गडावर उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:44 AM2018-10-15T00:44:21+5:302018-10-15T00:45:13+5:30
शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगगडावर एकच गर्दी केल्याने सकाळी ८ वाजेपासून बाºया लावण्यात आल्या.
कळवण : शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगगडावर एकच गर्दी केल्याने सकाळी ८ वाजेपासून बाºया लावण्यात आल्या.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांनी सहाव्या माळेला सपत्निक श्री भगवतीची पंचामृत अभिषेक व महापूजा केली. यावेळी जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा न्यायाधीश विशाल देशमुख, जिल्हा न्यायालयातील शिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्कअधिकारी भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर आदी उपस्थित होते. रविवारी दिवसभरात माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार विनायक मेटे, बडोदा घराण्याचे वंशज सत्यजित गायकवाड, सुरगाणा संस्थानचे वंशज रत्नशीलराजे पवार, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आपत्ती व्यवस्थापनचे राजीव चौबे यांनी कुटुंबीयासह भगवतीचे दर्शन घेतले.
सकाळी ६ वाजता काकड आरती झाली. सकाळी ८ वाजता महापूजेला सुरु वात करण्यात येऊन भगवतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यात आले. पैठणी, शालू नेसवून देवीचा साजशृंगार करण्यात आला. यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी १२ वाजता महानैवेद्य आरती व सायंकाळी साडेसात वाजता आरती करण्यात आली.
ट्रॉलीचे आकर्षण
गडावरील पायºया टाळून देवीच्या दर्शलाना जाण्यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आली असल्याने ट्रॉलीतून जाऊन दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याने ट्रॉलीची प्रतीक्षा करत देवीभक्तांना थांबवावे लागले. नवरात्रोत्सवात फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्प देवीभक्तांचे आकर्षण ठरले आहे.