दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:23 AM2019-12-22T01:23:51+5:302019-12-22T01:24:28+5:30

राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

 One and a half lakh farmers benefit from debt relief | दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा होणार लाभ

Next

नाशिक : राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकºयांना होणार असून, या कर्जमुक्तीचे पैसे थेट जिल्हा बॅँकेच्या खात्यात जमा होणार असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा भार हलका होऊन जवळपास दीड हजार कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली जात असून, युती सरकारच्या कालावधीत फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी स्वाभिमान कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले होते, परंतु या कर्जमाफी योजनेचा फारसा शेतकºयांना लाभ झाला नाही, अशा तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येऊन विरोधी पक्षांनी त्याचे राजकीय भांडवल केले होते. चालूू वर्षी अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान होऊन शेतकºयांच्या आणखी अडचणी वाढल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अग्रस्थानी होता. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकºयांना कर्जमुक्त करेल, असे आश्वासन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले असल्यामुळे नवीन सरकार व विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली असून, मार्च २०१५ नंतर कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांचे सरसकट दोन लाख रुपये कर्जमुक्ती करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकºयांनी नियमित
कर्ज परतफेड केली त्यांनाही प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे.
सरकारच्या घोषणेनुसार नाशिक जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतलल्या एक लाख ४५ हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार असून, दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या १९ हजार इतकी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या कर्जमुक्तीतून जिल्हा बॅँकेला ११ हजार कोटी ८४ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे, तर दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी उर्वरित कर्ज भरल्यास त्यापोटी ४२९ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी एक लाख १३ हजार शेतक-यांना फायदा
युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस सरकारने केलेल्या दीड लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा जिल्ह्यातील एक लाख १३ हजार शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यापोटी जिल्हा बॅँकेला सातशे कोटी रुपये मिळाले होते.

Web Title:  One and a half lakh farmers benefit from debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.