गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:41 PM2020-06-07T16:41:17+5:302020-06-07T16:42:05+5:30

१लाख ४३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

One and a half lakh goods were looted by breaking into the warehouse | गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला

गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला

Next
ठळक मुद्देविद्युत खांबांवर ‘शॉर्टसर्किट’

नाशिक : अज्ञात चोरट्यांनी जुनेनाशिक परिसरातील नानावली येथील तिगरानिया रोडवर असलेले एक गुदाम फोडून सुमारे दीड लाख रूपयांचा माल लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजिद बालम शेख (रा. गणेशनगर, वडाळा) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार ते काम करत असलेल्या गुदामाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी गुदामात ठेवलेल्या पेस्टीज कुकर, पॅन, प्रेस्टिज डीलक्स ग्रेनाईट, ताडपत्री बंडल असा एकुण १लाख ४३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात कारणातून युवकाची आत्महत्त्या
नाशिक : वडाळागावातील माळी गल्ली येथील सिध्द हनुमान मंदिरासमोर राहणारे कादीर शेख यांचा मुलगा मजहर शेख (२७) याने त्याच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत सिलिंग फॅनला वायर अडकवून गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर प्रकार त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मझहर हा वायरिंगचे काम करत होता. त्याच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून त्याने आत्महत्त्या करण्यापुर्वी भींतीवर काही मजुकर लिहून ठेवल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.

विद्युत खांबांवर ‘शॉर्टसर्किट’
नाशिक : वडाळागावातील पिंगुळबाग येथील एका म्हशीच्या गोठ्याला लागून असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या खांबावर रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन भडका उडाला. विजवाहिन्यांमधून सुरूवातील ठिणग्या पडण्यास सुरूवात झाली असता. गोठ्याजवळ राहणाऱ्या कामगारांनी तत्काळ सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. क्षणार्धात संपुर्ण केबलने आग धरली आणि रात्रीच्या अंधारात या भडकलेल्या आगीच्या ज्वाला लांब अंतरावरून सहज दिसत होत्या. घटनेची माहिती रहिवाशांनी अग्निशमन मुख्यालयाला कळविली. माहिती मिळताच सिडको उपकेंद्रावरील बंबासह जवान घटनास्थळी काही मिनिटांत पोहचले; मात्र तोपर्यंत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीजपुरवठा तत्काळ खंडीत केल्याने आग विझली होती. या घटनेत कुठल्याहीप्रकारची हानी झाली नाही.
-------

Web Title: One and a half lakh goods were looted by breaking into the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.