वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 05:01 PM2019-08-25T17:01:18+5:302019-08-25T17:04:24+5:30

काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या पुरात वाहुन गेल्या.

One and a half lakh seedlings in forest department nurseries | वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

Next
ठळक मुद्देपाणी ओसरल्यानंतर चित्र स्पष्ट

नाशिक : वीस दिवसांपुर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी बारा वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या महापूराचा फटका गंगापूर-गोवर्धन शिवारात असलेल्या वनविभागा पश्चिम नाशिकच्या रोपवाटिकेसह सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेला बसला. गंगाकाठ रोपवाटिका पुर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र होते कारण येथील पूलावरून महापूराचे पाणी वाहत होते. या दोन रोपवाटिकांमधील सुमारे दीड लाख रोपांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

गोदावरीला आलेल्या महापुरामुळे सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटीका तसेच पश्चिम वनविभाग गंगापुर रोपवाटीकेमधील १४० प्रजातीच्या जवळपास १ लाख ३५ हजार रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरापुर्वी सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटीकेत ३ लाख ६५ हजार रोपे, गंगापुर रापवाटीकेत ३ लाख ५ हजार रोपांचे संगोपन करण्यात आले होते. महापुरानंतर यामधील निम्या रोपांना पुराचा मोठा फटका बसला. यातील काही रोपांना वाचविण्यात यश आले. सुमारे दीड लाख रोपे सडल्यामुळे त्यांना फेकुन देण्याची वेळ दोन्ही रोपवाटीकांना आली आहे. महापुरामुळे या रोपवाटींकाची दयनीय अवस्था बघावयास मिळत आहे. यामधील अनेक रोपे पाण्याने सडली आहेत तर काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या पुरात वाहुन गेल्या.
----

३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी  रोपे
रोपवाटीकांमध्ये आंबा, आवळा, हिरडा, रिठा, अशोका, महारूख, रूद्राक्ष, कदम, उंबर, बेल, पेरू, कैलासपती, जास्वंद, शिलारोप, बांबु, खाया, कतरजिव, चिंच, वड, पिंपळ, जांभुळ, सिताफळ यांसारख्या विविध प्रजांतीच्या रोपांचे संगोपन करण्यात येते. त्यानंतर योग्य वाढ झालेली रोपे दरी-मातोरी, शिलापुर, मुंगसारे, ओढा, पिंपळगाव, तळेगाव, वाढोची या भागांमधील ग्रामपंचायतींना ३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी पुरविली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे. अद्याप टार्गेट ९५ टक्क्यांपर्यंत आले आहे.

Web Title: One and a half lakh seedlings in forest department nurseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.